• Breaking News

    Saturday, 24 September 2016

    Its india & Its Intigrity

    Image result for aarakshan
    माझं आरक्षण तुला घे
    तुझं आरक्षण मला दे
    बागायती तुझी जमीन
    नावावर आमच्या करुन दे
    आमची आरक्षीत जात
    तुला बिनधास्त मिळू दे!!!!१
    मलाही फिरायचंय परदेशी
    मलाही करायचीय चैनी
    करोडोंच्या गाडीतला एसीचं
    वारं मलाही कधी घेवु दे
    माझं आरक्षण तुला घे
    तुझं आरक्षण मला दे !!! २
    फाटक्या छतातुन गळणारं
    दुखं तुलाही कधी मिळू दे
    माझ्या दु:खाचं आरक्षण तुला घे
    तुझ्या सुखाचं आरक्षण मला दे
    माझं आरक्षण तुला घे
    तुझं आरक्षण मला दे!!! ३
    ठिगळं लावलेला संसार
    फाटकी,जीर्ण विजार
    दांडीवरच्या मळकट वळकटी
    डोळ्यात लाचारी,अपमान ललाटी
    हे सगळं तुला घे,
    माझं आरक्षण तुला घे
    तुझं आरक्षण मला दे!!!! ४
    स्वप्नांच्या चिंध्या,आशेच्या निराशा
    तुच्छ जगण्याची सल तु घे
    तुझा उच्चवर्णीय तोरा मला दे
    तुझ्या वाडे,इमले मला दे
    माझी कळकट झोपडी तुला घे
    माझं आरक्षण तुला घे
    तुझं आरक्षण मला दे !!!! ५

    No comments:

    Post a Comment