• Breaking News

    Saturday, 16 April 2016

    भारताचे संविधान कुणी लिहिले ? SOME REFERENCE

    भारताचे संविधान कुणी लिहिले ?
    अशी एक पोस्ट गेल्या 4 दिवसांमध्ये वायरल झाली आहे. कुणालाही खरे वाटावे किंवा डॉ बाबासाहेबांच्या योगदानाला मर्यादित करू पाहणारी ती पोस्ट अनेकांच्या विचारांना कुंठित करुन गेली.
    घटना एकट्या आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !"
    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नव्हेत असा जावई शोध लावणाऱ्या अतिशहण्या लोकांना कळत नाही, संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटना एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडतात. असा बुद्धिभेद करणे हे अतिशय संतापजनक आहे.
    सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही.
    "...भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन, "बाबासाहेब हे भारतीय व घटनेचे शिल्पकार नव्हतेच !" असे सांगून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. ही अवतरणे , घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत ....
    पुरावा क्र. १
    मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णम्माचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम बाबासाहेबांनी पार पाडले. ते निःसंशय आदरास पात्र आहेत.याचा अंतिम परिणाम असा झाला की, या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डाँ.आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य निःसंशय, अत्यंत समर्थपणे पूर्ण केले, याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.
    पुरावा क्र. २
    घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."
    पुरावा क्र. ३
    घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."
    डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा...
    (संदर्भ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ,पृष्ठ क्र.१०,प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन).

    01



    1 comment: